मोबाईल मध्ये, स्मार्टफोन्समध्ये 'हे' Apps असतील तर तात्काळ डिलीट करा, बँक अकाउंटला आहे धोका
गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. लोक दररोजचे व्यवहार Google pay, Paytm, Phone pay सारख्या पेमेंट अॅप्सच्या माध्मयातून करत आहे. एकीकडे या अॅप्समुळे आर्थिक व्यवहार सोपे झाले आहेत, तर दुसरीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे लोंकाची मोठी आर्थिक फसवणूक होताना आढळून येत आहे. काही अॅप्स आर्थिक व्यवहारासाठी धोकादायक ठरतात. अशा अॅप्सला ओळखणे गरजेचे आहे.
रिसर्च रिपोर्टनुसार, जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये Cake VPN, Pacific VPN, eVPN, BeatPlayer, BeatPlayer, QR/Barcode Scanner MAX, eVPN, Music Player आणि tooltipnatorlibrary अॅप्स इंस्टॉल असतील तर तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्ही या अॅप्सला त्वरित फोनमधून डिलीट करायला हवे. हॅकर्स या अॅप्सच्या मदतीने तुमच्या बँक अकाउंटची माहिती चोरी करू शकतात.
अशी होते फसवणूक
हे सर्व मॅलिशियस अॅप्स अँड्राइड अॅप्स आहेत. हे यूजरच्या फोनमध्ये AlienBot Banker आणि MRAT इंस्टॉल करते. AlienBot हे एक मॅलवेयर असून, जे फायनेंशियल अॅप्सद्वारे माहिती चोरी करते. याद्वारे बँकिंग माहिती चोरी होते. हे एवढे स्मार्ट असतात गुगलला देखील चकमा देतात. एवढेच नाही तर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड मोडून माहिती चोरी करण्यास सक्षम आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा
स्मार्टफोनद्वारे तुम्ही जर आर्थिक व्यवहार करत असाल तर नेहमी ओरिजनल अॅप्सचाच वापर करा. अॅप्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या अॅप लिंकवरूनच डाउनलोड करो. स्मार्टफोन आणि अॅप्सला वेळोवेळी अपडेट करावे. तसेच, फायनेंशिय अॅप्सला लॉक करावे. कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्सला डाउनलोड करणे टाळावे.
अजून अश्याच माहिती साठी आमचे फेसबुक पेज ला भेट द्या.
Special Security Computers Services
https://bit.ly/sscsfb

Comments
Post a Comment